Tuesday, October 18, 2011

अपमान करू नका त्यांच्या ममतेचा.....

अपमान करू नका त्यांच्या ममतेचा.....

बदलत चालले जग सरे, नाही इथे कुणी कुणाचा
स्वार्थी बनत चालला माणूस, काळ बदलतोय माणुसकीचा.....

ज्यांनी केले लहानाचे मोठे, त्यांना आज मुले विसरली
स्वता राहिले उपाशी तापाशी, मुलांच्या जीवनात सूखे भरली
रात्रण दिवस मेहनत करुनी, स्वता ओढली दुखाची सावली
त्याच मुलांनी घरा बाहेर काढुनी, गळा घोटला मनवतेचा.....

हीच आहे का आजची पीढी, प्याशन पैशापाठी धावत चालली
आई वडीलांनी घाम गालुनी, मुलांसाठी अनेक स्वप्न पाहीली
यांच मुलांनी हाकलून देताच, स्वप्न यांची अश्रुंनी वाहीली
अरे देव कोणी पाहीला नाही, पण देवारा असतो हा प्रतेक घरचा.....

भरत चालली आज वृध आश्रमे, जड वाटू लागले आई बाप
उतरत्या वयात सहारा छिनूनी, मुले करतात मोठे पाप
आई वडिलांना पैशाने तोलतात, विसरून जातात कर्तव्याचे माप
काय म्हणायच या पिढीला, स्वार्थ आहे हा आंधळे पणाचा.....

देवालाही जे जमले नाही, ते दिले आज आई वडिलांनी
पैशापुढे सर्व विसरले, मुले नाही त्यांची ऋणी
मुले असून नसल्या सारखे झाले, अनाथ झाले हे म्हातारपणी
आजच्या पिढीस सागने आहे, अपमान करू नका त्यांच्या ममतेचा.....

कमलेश प्रल्हाद  गुंजाळ

वर्त्तमान असे तर भविष्य काय.....


वर्त्तमान असे तर भविष्य काय.....

वर्त्तमान असे तर भविष्य काय
भ्रष्टाचाराने भारताचे खचवलेत पाय
हेच का आपल्या देश्याचे भवितव्य हाय.....
नेत्यांच्या ताटात तुपाची पूरण पोळी
शेतकर्यांच्या चुलीत नुसती निखार्यांची होळी
गरीब शेतकर्यांच्या घरात अन्न नाय
कर्जात शेतकर्यांचे पार रुतलेत पाय
हेच का आपल्या देश्याचे भवितव्य हाय.....

शिक्षण घेउनही आजच्या पिढीत नाचते बेकारी
नोकरीच्या रांगेतही वशिल्यावाल्यांची चालते हुशारी
पैशा पुढे डीगर्यांना आज किम्मत नाय
बेकारी मुळे गुन्हेगारी कड़े वळतात पाय
हेच का आपल्या देश्याचे भवितव्य हाय.....

महागाईच्या वणव्यात आज गरीब होरपळतोय
करवाढीच्या आगीत आज सामान्य जळतोय
कर भरुनही पाणी विज इथे मिळत नाय
देश सोडून नेते फक्त पक्ष चालवताय
हेच का आपल्या देश्याचे भवितव्य हाय.....

पूर्वी देशासाठी अनेक शाहिदांनी दिलेत प्राण
आजचे नेते सत्तेसाठी घालवतात देशाचा मान अभिमान
पण काय करणार त्यात नेत्यांची चुक नाय
पैशापूढे तिरंग्याचे रंग अन शहिदांची यादीच हरवली हाय
हेच का आपल्या देश्याचे भवितव्य हाय.....
कमलेश प्रल्हाद गुंजाळ

बॉम्ब फोडतात पुन्हा पुन्हा.....


बॉम्ब फोडतात पुन्हा पुन्हा.....

नका उडवू झोप आमची, काय केला आम्ही गुन्हा
धर्मं जातीचे नाव घेउनी, बॉम्ब फोडतात पुन्हा पुन्हा.....

मास बिघरते रक्त सांडते, मरतात इथे निष्पाप जीव
आई वडिलांपासून मूल छिनते, पाहून येते त्यास कीव
डोळ्यांमधून अश्रु वाहता, दुखाने होतो व्याकुळ जीव
नेता येते पाहून जातो, जाहिर करतो पैसे पुन्हा.....

असो हिंदू असो मुसलमान, या धरतीची लेकरे आपण
धर्मं जातीचे नाव घेउनी, नेता साधतो आपली साधन
निष्पाप जनता आगीत लपटते, नेत्यास मिळते त्याचे आसन
नका लढू रे आपआपसात, आपल्याच हातून घडतोय गुन्हा.....

आई मरते बाप मरतो, पोरके होते मूल तान्हे

घर बनते स्मशान घाट, बिखरतात आयुष्याची सर्व पाने
या आगीत मरतात सारे, मरतात इथे हिंदू मुसलमाने
दहशतवाद्यास ठेचुन काढा, देऊ नका त्यास पन्हा.....

हवा बुद्ध हवा येशु, नको आम्हास रक्त पिशासु
शांत प्रिय देशास माझ्या, डोळ्यात येते रक्ताचे आसू
निरागस जनतेच्या चिंधड्या उड़ताच, दहशतवाद्यास येते हसू
असा हां भयानक राक्षस, बॉम्ब फोडतो पुन्हा पुन्हा.....

कमलेश प्रल्हाद गुंजाळ

आवाज भारत मातेचा.....

आवाज भारत मातेचा.....

लाख प्राण मेले चालतील
पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे,
अनेक दिवस बकरी होउन जगण्या पेक्षा
माणूस एक दिवस वाघ होउन जगला पाहिजे.....

टाकली आज आपण मान
आली आज भारतावर वेळ,
लपेचुपे युद्ध करुनी
पाकिस्तान खेळतोय रक्ताचा खेळ.....

नको आम्हास लाचार मंत्री
मृतांची नको हाय पाहिजे,
आज आपल्या भारत देशास,
कडाडणारा शिवराज पाहिजे.....

अनेक देश करतात आपल्याशी मैत्री
कधी खुपसतात पाठीत सुरा,
शिवराज आम्हास सांगुन गेलेत
दुश्मनास तिथेच मातीत पूरा.....

नको आम्हास दुर्बळ वृती
नेता असा कनखर पाहिजे,
सदैव झडून विजय मिळवणारे
डॉ. बाबा साहेब आंबेडकर पाहिजे.....

कधी कश्मीर तर कधी मुंबई
रक्तात निघतोय न्हाउनी देश,
पकिस्तान करतोय भारतावर वार
दहशत वाद्याचा घालुनी वेश.....

आपल्या देशास आवाज उठवनारी
नविन पिठीची हाक पाहिजे,
देशासाठी सदैव लढ़णारे
अनेक तरुण भगतसिंह पाहिजे.....

                           कमलेश प्रल्हाद गुंजाळ

प्रेम.....




प्रेम.....

प्रेमाच्या भाषा अनेक नाव एक
प्रत्येकाच्या मनात बसत याच गाव एक.....

ह्रुदयातून वाहतो याचा भाव एक
लहानापासून मोठ्यापर्यंत याची धाव एक.....

प्रियसीपासून मैत्रीपर्यंत याच्या भाषा अनेक
हे खर मिळाव जगात याची आशा एक.....

सर्वांच्या ह्रुदयात दिसते ही दिशा एक
खोट्या प्रेमात मिळते याची निराशा एक.....

प्रेमाच्या असतात भावना अनेक
विशवात वाहते याची कामना एक.....

डोळ्यातून ह्रुदयात उतरतो हा जीना एक
काळ कुठला ही असो याचा ज़माना एक.....

देवानी दिलेले हे वरदान एक
खरया मनात याच दान एक.....

तुटलेल्या ह्रुदयात याच रान एक
सर्व लोकात याचा मान एक.....

प्रेमाच्या भाषा अनेक नाव एक
प्रतेकाच्या मनात बसत याच गाव एक.....

कमलेश प्रल्हाद गुंजाळ