जिवंत आहे जरा जरा मी.....
जिवंत आहे जरा जरा मी, दिवा जसा विझताना.. अखेरची ही भेट आपली, या उदास खिन्न क्षणांना .. तुटून गेलेत सर्व धागे, आता कुणीन तुझा मी.. विरून जातील प्राण माझे, उद्या नसेन कुठेही.. जळे हृदय माझे, कधी तुझेच जे होते.. आता कसे तुझ्यावीण या जीवनाचे वाहायचे ओझे????? कळेना कुठले तुफान आले, लुटून नेले दिव्यांना.. अनोळखी लागलो मी दिसाया, तुझ्याच मग डोळ्यांना.. कशी तुझीही नजर बदलली, आता कशास विचारू???? आता न फिरशील कधीच मागे, तुला कशास पुकारू ? नव्या दिशा अन नवीन वाट, तुला नवीन किनारा.. दिलास तू सोबतीस माझ्या, भयाण वादळ वारा.. जळे हृदय माझे, कधी तुझेच जे होते.. आता कसे तुझ्यावीण या जीवनाचे वाहायचे ओझे????? मनात जे एक स्वप्न होते, तडेच त्याला गेले.. जाळून गेली तहान माझी, तृषार्थ ओठ जाळले.. जरी कितीही पूर आसवांचे, उरात माझ्या आले.. टिपूस ही पापणीत नाही, सुकून गेले डोळे.. उन्हात माझा प्रवास आता, नसेल सोबत कोणी.. कधीतरी सापडेल तुजला, धुळीत माझी विराणी.. जळे हृदय माझे, कधी तुझेच जे होते.. आता कसे तुझ्यावीण या जीवनाचे वाहायचे ओझे????
0 comments:
Post a Comment