Tuesday, October 18, 2011

वर्त्तमान असे तर भविष्य काय.....


वर्त्तमान असे तर भविष्य काय.....

वर्त्तमान असे तर भविष्य काय
भ्रष्टाचाराने भारताचे खचवलेत पाय
हेच का आपल्या देश्याचे भवितव्य हाय.....
नेत्यांच्या ताटात तुपाची पूरण पोळी
शेतकर्यांच्या चुलीत नुसती निखार्यांची होळी
गरीब शेतकर्यांच्या घरात अन्न नाय
कर्जात शेतकर्यांचे पार रुतलेत पाय
हेच का आपल्या देश्याचे भवितव्य हाय.....

शिक्षण घेउनही आजच्या पिढीत नाचते बेकारी
नोकरीच्या रांगेतही वशिल्यावाल्यांची चालते हुशारी
पैशा पुढे डीगर्यांना आज किम्मत नाय
बेकारी मुळे गुन्हेगारी कड़े वळतात पाय
हेच का आपल्या देश्याचे भवितव्य हाय.....

महागाईच्या वणव्यात आज गरीब होरपळतोय
करवाढीच्या आगीत आज सामान्य जळतोय
कर भरुनही पाणी विज इथे मिळत नाय
देश सोडून नेते फक्त पक्ष चालवताय
हेच का आपल्या देश्याचे भवितव्य हाय.....

पूर्वी देशासाठी अनेक शाहिदांनी दिलेत प्राण
आजचे नेते सत्तेसाठी घालवतात देशाचा मान अभिमान
पण काय करणार त्यात नेत्यांची चुक नाय
पैशापूढे तिरंग्याचे रंग अन शहिदांची यादीच हरवली हाय
हेच का आपल्या देश्याचे भवितव्य हाय.....
कमलेश प्रल्हाद गुंजाळ

0 comments:

Post a Comment