Pages

Wednesday, October 19, 2011

जिवंत आहे जरा जरा मी.....


जिवंत आहे जरा जरा मी..... 
जिवंत आहे जरा जरा मी, दिवा जसा विझताना.. 
अखेरची ही भेट आपली, या उदास खिन्न क्षणांना ..

तुटून गेलेत सर्व धागे, आता कुणीन तुझा मी..
विरून जातील प्राण माझे, उद्या नसेन कुठेही..
जळे हृदय माझे, कधी तुझेच जे होते..
आता कसे तुझ्यावीण या जीवनाचे वाहायचे ओझे?????

कळेना कुठले तुफान आले, लुटून नेले दिव्यांना..
अनोळखी लागलो मी दिसाया, तुझ्याच मग डोळ्यांना..
कशी तुझीही नजर बदलली, आता कशास विचारू????
आता न फिरशील कधीच मागे, तुला कशास पुकारू ?
नव्या दिशा अन नवीन वाट, तुला नवीन किनारा..
दिलास तू सोबतीस माझ्या, भयाण वादळ वारा..
जळे हृदय माझे, कधी तुझेच जे होते..
आता कसे तुझ्यावीण या जीवनाचे वाहायचे ओझे?????


मनात जे एक स्वप्न होते, तडेच त्याला गेले..
जाळून गेली तहान माझी, तृषार्थ ओठ जाळले..
जरी कितीही पूर आसवांचे, उरात माझ्या आले..
टिपूस ही पापणीत नाही, सुकून गेले डोळे..
उन्हात माझा प्रवास आता, नसेल सोबत कोणी..
कधीतरी सापडेल तुजला, धुळीत माझी विराणी..
जळे हृदय माझे, कधी तुझेच जे होते..
आता कसे तुझ्यावीण या जीवनाचे वाहायचे ओझे????

Tuesday, October 18, 2011

"मैत्री"

  "मैत्री"

मैत्री म्हणजे उधान आलेल्या                      

समुद्राच्या बेधुंद लहरी लाटा.....
         मैत्री म्हणजे वय, जात, धर्म, भाषा
        झुगारून जोडलेल्या असंख्य वाटा.....
मैत्री म्हणजे शब्दात न मांडणार
सर्व नात्यांपलीकडच नात.....
        मैत्री म्हणजे सर्व नात्यांना
        मनातून समानतेन जोड़ल जात.....
मैत्री म्हणजे कॉलेज कट्ट्यावरची
टिंगल टवाळकी आणि कैफियत.....
       मैत्री म्हणजे माणुसकीच झाड उगवण्यासाठी
       टाकलेल प्रेमाच हळव ख़त.....
मैत्री म्हणजे सुख-दुखामध्येही
समोरच्याला साथ देण.....
        मैत्री म्हणजे प्रत्येक वेळी
        समोरच्याच हात होण.....
मैत्री म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा
नसतो नुसता दोन शब्दांचा खेळ.....
        मैत्री म्हणजे प्रत्येक क्षणात
        सुख दुखात साथ द्यायची असते ती वेळ.....
   
                                        कमलेश प्रहाद गुंजाळ

वाट मनातली

वाट मनातली

ही वाट एकटी एकटीच राहिली
मनातल्या स्वप्नातून तुट्ताच वाहिली.....

पाहिले एक स्वप्न मनातल्या वाटेतून
मन भोले भाबडे पडले प्रेमात फसून
प्रेमातही पैसा लागे हसले एकटे बसून
डोळ्यातल्या पाण्यातून वाट डूबती पाहिली.....

मन हे सादे ठेवे कुणावरही विश्वास
पाखरा सारखे उड़े घेउनी हल्का श्वास
स्वप्न होईल खरे रुदयात ठेवे आस
मनातली वाट माझी स्वप्नातच राहिली.....

मन शोधत राहते जीवनातली काट
नहीं कळत त्यास खरया खोट्याचीही वाट
मनातल्या वाटेतून झेले दुखाचिही लाट  
वाट स्वप्नातून मनातल्या मानत राहीली.....

मन स्वप्नातल्या वाटेतून आभाळी घेते झेप
शब्दांचा काटा रुतता रुदयास लावे लेप
हसत हसत मन वाहे दुखाचिही खेप
वाट ही अशीच मनात एकटी राहीली..... 

कमलेश प्रहाद गुंजाळ

पहिले प्रेम.....

पहिले प्रेम.....

मावळत्या सूर्या सवे उधळीत प्रेम बसली ती सांजवेळी
भारावलेल्या डोळ्यातील स्वप्ने घेउन माझ्याजवळी......

हात माझा हाती घेत ओघळले अश्रु तुझे
थेंम्बा थेंम्बात एकच नाव मलाच दिसले माझे.....

सांज विजुन रात झाली आली रात राणी
डोळ्यातील स्वप्नात जखडलो आम्ही दोघ आडाणी.....

घाबरलेल्या मनास माझ्या ठेविले प्रज्वलित श्वासांनी
होकार देत नजरेतुनी सावरले मलाच तिच्या आसवांनी.....

होता नवता विचार संपला जणू जिंकल जग सार
नजरेतुनी होकार मिळता चिंता पळाली पार.....

थरथरलेल्या मनातून पडला गळून शब्दांचा नकाब
तना मनाच्या व्याकुलतेला मिळाला प्रेमाचा जाब.....

जन्म मरणाच्या या फेरीला मिळाली नवी साथ
रात चांदण्यास देत साक्षी आयुष्यभराचा धरला हात.....

                                    कमलेश प्रल्हाद गुंजाळ


पहिल्या पावसाची पहिली सर.....

पहिल्या पावसाची पहिली सर.....

आता नुकतीच बरसली पहिल्या पावसाची पहिली सर
तुझ्या आठवणींचा स्पर्श हळुवार जाणवला अंगभर.....

पावसात भिजलेले क्षण आज पुन्हा डोळ्यात साठले
डोळ्यातल्या आसवांनी धावत पुन्हा आठवणींना गाठले.....

पावसासवे तुझ्या आठवणीही डोळ्यात बरसत राहिल्या
पावसाच्या पाण्याबरोबर त्याही नकळत गालावर धावल्या.....

माझ्या दु:खातही पाऊस आनंदाचे क्षण घेऊन कोसळला
विखुरलेल्या मनाला सावरत जुन्या आठवणीत मिसळला......

पावसाच्या सरी झेलत व्याकूळ मन भूतकाळात रमले
सुखद आठवणींना उजाळा देत दु:खही माझे क्षमले.....

पुन्हा एकदा हिरवळली मनात आठवणींची पाऊल वाट

पहिल्या पावसातल्या क्षणांची ओंजळ भरली काठोकाठ .....

ढगांकडे पाहत मी पावसाच्या सरी झेलत राहिलो
डोळ्यातले अश्रू लपवत बेभान होऊन भिजत राहिलो.....

कमलेश प्रल्हाद  गुंजाळ

कविता कधी अशीच सुचत नाही.....

कविता कधी अशीच सुचत नाही.....
मनाच्या कोपर्यात कविता कधी अशीच सुचत नाही
कुठे तरी मनात बोलता सांगणार असत खुप काही.....

मनात घुटुन बसतात व्यक्त होणारे असंख्य शब्द
मन हतबल होउन निपुट पणे पाहत सगळ स्तब्ध.....

फेडन्याची इच्छा असुनही फेडताच ठेवावी लागतात देणी
अनेक दुख गिळत आपण डोळ्यातलेही थेंब गिलतो मनोमनी.....

जगण्याच नाटक कराव लागत क्षणोक्षणी मरताना
जिंकत आलेल स्वप्न पाहाव लागत कधी हरताना.....

उन्हाचे चटके झेलून अनेकांसाठी झाडाची सावली व्हाव लागत
सार असह्य होउन सुद्धा डोळ्यातील थेंम्बाना निमूट प्याव लागत.....

अनेक विचार मांडल्यावर मग कागदावर येतात शब्द धाऊन
विचारांच्या जंगलातला वणवा पेटताच विजतो राहून.....

हे सार सोसल्यावर मग कुठे जन्मते कविता टीच भर
टीच भर असली तरी अनेकांचे गहिवरून आणते मन खर.....

कमलेश प्रल्हाद  गुंजाळ

"माझी आठवण कधीतरी येईल तुला"

"माझी आठवण कधीतरी येईल तुला"

माझी आठवण कधीतरी येईल तुला
जुन्या आठवणीत मग तू शोधशील मला.....

कुणालातरी माझी आठवण सांगताना तू हसशील
पण त्या आठवणीत मला पाहताच तू रडशील.....

आठवेल तुला समुद्र किनारी आपल्या दोघांच फिरन
तुझ्या थरथरत्या स्पर्शात मी स्वता हरवून जान.....

तू माझा हातात हात घेउन अनेक स्वप्न सजवन
माझ्या डोळ्यात पाणी येताच मला हसवण.....

आठवेल तुला आपल्या प्रेमातला तो जुना पाउस
एकाच छत्रीत पाउसात भिजणारी ती आपली हाउस.....

ओल्या चिम्ब तुझ्या स्पर्शात अंगावर येणारे शहारे
काळ्या गर्द वातावरणात मोहरून गेलेले ते अंग सारे.....

माझी आठवण येताच मी जवळ असल्याच तुला भासेल
तुझ्या डोळ्यातून निघालेला अश्रुचा प्रतेक थेंब मी असेल.....

तू एकटी बसल्यावर आठवेल तुला प्रतेक क्षण
त्या क्षणांमधे दिसेल तुला माझ तडफडणार मन.....

माझी आठवण कधीतरी येईल तुला
व्याकुळ होउन तुझ मन शोधेल मला.....

कमलेश प्रल्हाद गुंजाळ

ती दिसली.....

ती दिसली.....

भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरले
तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रु बरसले.....

तिचीच आस धरून, आयुष्यात मी बिखरलो
नसताना ती जवळ, जगनेही मी विसरलो.....

तिचीच वाट पाहत, पापण्या माझ्या पाणवल्या
सावल्या डोळ्यातून ह्या, आभाळा सारख्या बरसल्या.....

खुप काही म्हणायच होता, शब्द माझे आतुरलेले
मुखातून न उमलता, डोळ्यातून उमललेले.....

म्हंटल ज़रा जवळ जाऊन, तिच्याशी थोड बोलाव
तिच्या आठवणीसंगे जगतो, तिलाही थोड कळाव..... 

तिच्या आठवणीची ओंजंळ, तशीच भरून ठेवलेली 
एकही क्षण न सांडवता, जिवापाड मी जपलेली.....

कंठ आज दाटून आला, तिला समोर पाहून
बरच काही बोलायच होत, मनात गेले शब्द राहून.....

इतक्यात तिने पाहिले मला, डोळ्यात अश्रु ढाळत
अनेक प्रश्नांची उत्तर मिळाली, मलाही न कळत.....

नव्हती ती आज माझी, झाली दुसर्या कोणाची
रेशम गाठी तुटल्या आमच्या, तरी सदैव राहिली ती या वेड्या मनाची.....

कमलेश प्रल्हाद गुंजाळ

फक्त तुझ्यासाठी.....

फक्त तुझ्यासाठी.....

आयुष्य असेच सरले, धावत आठवणींच्या पाठी
सबंध आयुष्य वाट पहिली, मी फक्त तुझ्यासाठी.....

तुझ्या येण्याची वाट पाहत, शब्द गोठले आज ओठी
ह्रुदयात दुःखाचे भास कवळले, मी फक्त तुझ्यासाठी.....

जगलो असा की मी, जगणे राहून गेले पाठी
डोळ्यातले अश्रु ह्रुदयात कोंडले, मी फक्त तुझ्यासाठी.....

हर घडी तुझ्या प्रेमाची, मनात ठेवली आस मोठी
त्या आशेवर जगत राहिलो, मी फक्त तुझ्यासाठी.....

तुझ्याच समोर झुकते मन, हे मन ही आहे फार हट्टी
याच हट्टावर आयुष्य बेतले, मी फक्त तुझ्यासाठी..... 

नाशिबाशी झगडत झगडत, न तोड़ता प्रेमाच्या गाठी
त्या गाठीना सामभालुन, ठेवले मी फक्त तुझ्यासाठी.....

एक एक क्षण तुझ्या प्रेमाचा, आज माझ्या डोळ्यात दाटी
त्या क्षणानना उराशी कवटाळले, मी फक्त तुझ्यासाठी.....

अंधार विजत उजेड यावा, भान विसरून जूळावि मीठी
याच स्वप्नांना आयुष्य समजलो, मी फक्त तुझ्यासाठी.....

तुझीच वाट पाहत, जळले ह्रदय प्रेमाकाटी
भिन्न दिशांना झुरत, राहिलो मी फक्त तुझ्यासाठी.....

कमलेश प्रल्हाद गुंजाळ

जन्म मृत्यु

जन्म मृत्यु

जगणे मरणे आयुष्याचा खेळ लपंडाव
दैवापुढे असते अधूरी आपली धाव
जन्म मृत्यु आहे त्याचे नाव.....

काय मीळवल काय गमवल
या जन्मी मी काय कमवल
अपरिचित मनातील भाव
सुख दुःखाचेहे गाव
जन्म मृत्यु आहे त्याचे नाव.....

तुझ्याच अंतरी कीती हसले जगले
हाडा मासाचे देह उरले
नाही कुणास पुनर जन्माची ठाव
दैव घाली काळाचा डाव
जन्म मृत्यु आहे त्याचे नाव.....

जन्मतो वेदनांनी मारतो आठवणीनी
आयुष्य सजवतो अनेक स्वप्नांनी
मनात उरते ईच्छेची हाव
आयुष्य झेलते अनेक घाव
जन्म मृत्यु आहे त्याचे नाव.....

आयुष्य चढते कधी दुखांचे पर्वत
भिखरलेल्या सुखांना ओंझळीत धरवत
दैवाचा मिळत नाही मेहनतिला वाव
क्षितीजाहि पलिकडे अधूरी आपली धाव
जन्म मृत्यु आहे त्याचे नाव.....

कमलेश प्रल्हाद गुंजाळ

आई

आई

माया ममता भरुनी जीव लावते आई
नाही जगात कोठे अशी दूसरी ममताई.....

मंदिराचा कळस दिसावा तशी आईची ख्याति
अंगनातिल तुळशी प्रमाणे संभाळते घरची नाती
प्रेमस्वरूप तुझे वात्सल्य तुझी स्मुति मनात ठाई
घराघरात दारादारात तुझे स्मरण होते आई.....

वृक्ष जसे उन्हात न्हाउनी सर्वास देते साउली
तसे मनी दुख झेलुनी सुख देते माउली
देवाचेही भान हरपते तुझ्या ममते पाई
हात जोडून देव म्हणे तुला शरण गे आई.....

अर्थहिन् जीवन होता तूच देते वैभव माया
तुझ पाहून या धरतीची सुखलोलुप झाली काया
तुझ पाहून वेदना सरया अदागालित लपून जाई
भूक ही तुझ्या प्रेमाची शांत ना होणार आई.....

गुंतलेले तुझे हात नेहमी असतात कामात
तुझी अंगाई एकावयास चंद्र घेउन येई रात
स्वप्न एक ठरावे खरे पुढल्या जन्मी मिळावी पुण्याई
तुझ्याच पोटी यावा जन्म हीच आस मोठी आई..... 

कमलेश प्रल्हाद गुंजाळ